श्री संत सावता माळी मंडळ

आपण सर्व  माळी समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई या महानगरांमधे आलो आहोत..मुंबईचे जीवन अतिशय धकाधकीचे धावपळीचे आहे. आपला समाज बांधवांशी संपर्क दिवसेंदिवस कमी होत चालला आहे प्रत्येक जण आपापल्या कामात  अतिशय बिझी आहे त्यामुळे आपल्या मुलांची मुलींची लग्ने जमवताना त्यांना इच्छित स्थळ मिळण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. समाजाचे ही अडचण लक्षात घेऊन आम्ही ठरवले की आपण वधुवर मंडळ स्थापन केले पाहिजे सर्वप्रथम श्री संपत मारुती जाधव यांनी  वधुवर मंडळाची किती गरज आहे हे सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संत सावतामाळी मंडळाने ठरवले की आपण संत सावता वधू वर नोंदणी सूचक मंडळ स्थापन करायचेठरल्याप्रमाणे 2 फेब्रुवारी 2003 रोजी संत सावता माळी वधूवर नोंदणी सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली. नियोजित वधू वर नोंदणी सूचक केंद्राचे उद्द्घाटन श्री सुदाम शेठ हिवरकर माजी स्थायी समिती सभापती नवी मुंबई महानगरपालिका यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त राष्ट्रपती पदक विजेते श्री अशोक गोरे साहेब समाजसेवक डी के माळी  साहेब मोठ्या संख्येने श्री संत सावतामाळी मंडळाचे कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.

सन 2003 पासून वर्षातून दोन मेळावे कोणतेही शुल्क घेता घेतले जातात. आज मंडळाकडे वधूवरांच्या नोंदणी केलेल्या जवळ जवळ 40 फाईल आहेत. त्यामध्ये  डॉक्टर ,इंजिनीयर, वकील,शिक्षक ,सॉफ्टवेअर इंजिनियर व्यवसायिक ,सीए  इत्यादी शाखेतील भरपूर स्थळे उपलब्ध आहेत श्री संत सावता माळी मंडळा अंतर्गत चालणारे हे वधू वर सूचक मंडळ सूचक नोंदणी केंद्र वर्षाचे 365 दिवस सर्वांसाठी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सायंकाळी 4 ते रा.8 या वेळेपर्यंत खुले असते. वधूवर पालक सातत्याने  मंडळांमध्ये येऊन आपल्याला हव्या असलेल्या वधु वरांची  नोंद घेत असतात.. संत सावता वधू वर सूचक मंडळाचे संचालक पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.आज पर्यंत आपल्या या संत सावता वधु वर नोंदणी सुचक केंद्र मार्फत भरपूर विवाह जमले गेले आहेत. सदर संत सावता माळी वधू वर नोंदणी वर सुचक केंद्राच्या पहिल्या वेबसाईटचे उद्घाटन शनिवार दिनांक 30  सप्टेंबर 2017 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आले होते. यासाठी श्री संतोष सहादु शिंदे ,सौ.उज्वला शिंदे आणि श्री सुखदेव भुजबळ यांनी विशेष  परिश्रम घेतले. अशा प्रकारे श्री. संत सावता माळी मंडळाचे वधु-वर नोंदणी व सुचक केंद्राचे काम निरंतर चालू आहे.

श्री संत सावता माळी मंडळ , ऐरोली

Address : Shri. Sant Sawata Mali Mandal, Sant Sawata Bhavan, plot no. 31,Sector 5,Airoli, Navi Mumbai,400708

Contact No. : 9324037399

office timing : 9:00 am to 1:00 pm & 4:00 pm to 8:00 pm

Mali Vadhu-Var Suchak Kendra

A happy marriage is a long conversation which always seems too short. Register now to find your perfect match.

© All Rights Reserved | Designed by Minimasters